Ad will apear here
Next
ठाणे खाडीच्या प्रदूषणमुक्ततेचे संकेत
मध्यंतरी दुर्मीळ झालेले श्वानसर्प, निवटे मासे आढळले


ठाणे :
गेल्या काही वर्षांत ठाणे खाडी प्रदूषणाच्या गर्तेत अडकल्याचे चित्र दिसत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे या खाडीची प्रदूषणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नुकतेच या खाडीत दोन श्वानमुखी सर्प आढळले. हे निमविषारी सर्प मध्यंतरीच्या काळात या खाडीत दिसत नव्हते. काही दिवसांपूर्वीच निवटे मासेही बऱ्याच कालावधीनंतर येथे आढळले होते. खाडी प्रदूषणमुक्त होऊ लागली असल्याचेच हे संकेत आहेत. 

श्वानमुखी सर्प छोटे बेडूक, निवटे मासे, तसेच चिंबोऱ्या खातो. पर्यावरणाचा समतोल साधला गेला, की जैवविविधता आढळू लागते. खाडीकिनाऱ्यांमुळे ठाण्याच्या सौंदर्यात भर पडत आहे; मात्र हे किनारे गेल्या काही वर्षांपासून कमालीचे प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. या किनाऱ्यांवर टाकला जाणारा कचरा, तसेच उल्हासनगर, अंबरनाथ येथून येणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे खाडीमधील आवश्यक जीवजंतू नष्ट होऊ लागले होते. परंतु ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे खाड्यांचे चित्र पालटू लागले आहे. 

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घोडबंदर, रेतीबंदर आदी परिसरातील खाडी किनारे विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हे  परिसर त्यांनी अतिक्रमणमुक्त केले आहेत. येथे होणारी खारफुटी वनस्पतींची तोड आटोक्यात आणून आवश्यक त्या ठिकाणी नव्याने खारफुटी रोपांची लागवड केली आहे. खाडीकिनारी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत. त्यामुळे हे किनारे स्वच्छ होऊन पाण्याची गुणवत्ताही सुधारू लागली आहे. त्यामुळेच खाडीच्या पाण्यातून काही वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले मासे, निवटे, खेकडे, सर्प पुन्हा दिसू लागले आहेत.

गेल्या महिन्यात ठाण्यातील घोडबंदर, कोपरी, विटावा, रेतीबंदर आदी ठिकाणी खाडीकिनाऱ्यांवर निवटे मासे दिसून आले होते. आता येथील कोपरीच्या खाडीवर श्वानमुखी सर्प आढळून आले आहेत. निवटे, बेडूक, लहान खेकडे, मासे आणि पाण्यातील इतर जीव खाणारे हे सर्प १७-१८ वर्षांपासून या परिसरात दिसून येत नव्हते. फक्त खाड्यांमध्येच राहणाऱ्या या सर्पांचे तोंड श्वानासारखे दिसत असल्याने त्यांना श्वनामुखी हे नाव पडले आहे. पर्यावरणप्रेमी प्रियांका शर्मा यांना कोपरी येथे या जातीचे दोन सर्प दिसले. खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या गाळात मोठ्या प्रमाणात निवटे मासे दिसून येत आहेत. त्यामुळे गाळात आणि पाण्यात राहणारे हे सर्प निवटे खाण्यासाठी येथे आले असावेत, असे वाटते. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्याचे खाडीकिनारे प्रदूषणमुक्त होऊ लागल्यामुळे हे चांगले संकेत दिसू लागले आहेत.

ठाण्यातील सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी या सापाविषयी माहिती दिली. ‘हा साप निमविषारी असून, प्रामुख्याने तो खाडीकिनारी चिखलात आढळतो. त्याचे दर्शन दुर्मीळ समजले जाते. हा साप २५ ते ३० पिल्लांना जन्म देतो. त्याची लांबी सुमारे चार-पाच मीटरपर्यंत होऊ शकते. तो करड्या रंगाचा असतो. तसेच तो निशाचर असतो. या सापाचे तोंड श्वानासारखे असल्याने त्याला श्वानमुखी साप असे म्हटले जाते. १७ ते १८ वर्षांपूर्वी हे साप या परिसरात मोठ्या प्रमाणात दिसायचे; पण त्यानंतर ते दुर्मीळ झाले होते. परंतु आता ते पुन्हा दिसू लागल्याने ठाण्याच्या खाड्या स्वच्छ होऊ लागल्या आहेत, असे वाटते. कोळी बांधव आणि या सापांचे नाते घट्ट समजले जाते,’ असे कुबल म्हणाले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZLMBS
Similar Posts
हिवाळी पाहुणे आलेसुद्धा! ठाणे : हिवाळ्यात अनेक परदेशी पक्षी स्थलांतर करून भारतात येतात, अनेक पाणवठे त्यांच्या गर्दीने फुलून गेलेले दिसतात. यंदा मात्र पावसाळा अद्याप संपला नाही, तोच हे हिवाळी पाहुणे दिसू लागले आहेत. ठाणे खाडी परिसरात आत्ताच फ्लेमिंगो, गल यांसारखे पक्षी दिसू लागले आहेत. यंदा थंडीचा हंगाम लवकर सुरू होणार असल्याचे हे संकेत असल्याचे मानले जात आहे
... आणि बगळ्याला मिळाले जीवदान ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण घड्याळाच्या काट्यावर चालतात. त्यामुळे दुसऱ्याला मदत करायला वेळ कोणाकडेच नसतो. प्राणी-पक्ष्यांना मदत करणे ही तर खूप दूरची गोष्ट. असे असले तरी काही चांगली उदाहरणेही समाजात अधूनमधून पाहायला मिळतात. तसेच एक उदाहरण नुकतेच ठाण्यातही पाहायला मिळाले. येथील एका युवकाने
‘रिक्षाचालकांनी निर्माण करावा आदर्श’ ठाणे : ‘रिक्षाचालकांनी शिस्तीचे पालन करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही किंवा नागरिकांची गौरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी व इतर शहरांतील रिक्षाचालकांसाठी एक आदर्श निर्माण करावा,’ असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. नवीन रिक्षा स्टँड तयार करणे, रिक्षाचालकांसाठी रिक्षाचालक
ई-वाहनांच्या विविध पर्यायांवर ठाणे महापालिका आयुक्तांसमवेत तज्ज्ञांची बैठक ठाणे : शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पांच्या विविध पर्यायांवर चार जुलै रोजी  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त वाहतूक आयुक्त सहस्रबुद्धे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक जलजारे, इलेक्ट्रिकल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language